ऑफिसमध्ये बसून काम, तुमचे आरोग्य धोक्यात

 बसून काम करण्याचे अनेक तोटे आहेत. 

Updated: Aug 24, 2019, 10:57 PM IST
ऑफिसमध्ये बसून काम, तुमचे आरोग्य धोक्यात  title=

ठाणे : बसून काम करण्याचे अनेक तोटे आहेत. कार्यालयात बसून काम करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी. तुम्ही जर नऊ तासांपेक्षा जास्त वेळ ऑफिसमध्ये बसून काम करत असाल तर तुमचे आरोग्य धोक्यात आहे, हे समजून जा. नऊ तासांपेक्षा जास्त एकाच जागी बसून काम करणाऱ्यांचा इतरांच्या तुलनेत लवकर मृत्यू होत असल्याचा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. 

तुम्ही घरात आणि कार्यालयात नऊ तासांपेक्षा जास्त वेळ बसून राहत असाल तर तुम्ही लवकर मरणार. हो आम्ही जे बोलतोय ते खरे आहे. तुमचे एका जागी बसणे मरणाला आमंत्रण देणारे आहे. ब्रिटीश वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका संशोधनपर अहवालात हे धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आले आहेत. 

एका जागी खूर्चीत बसून काम करणे हे अनेक आजारांना निमंत्रण देणारे असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. शारीरिक हालचाली आणि मृत्यू याचा संबंध असल्याचे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. बसून काम करण्याबाबत डॉ. शेखर शेखर शिरोडकर यांनी धोका असल्याचे म्हटले आहे.

शहरी भागात बहुतांश लोक कार्यालयात खूर्चीत बसून काम करतात. या लोकांनी दररोज किमान २४ मिनिटे वेगाने चालले पाहिजे. आठवड्यातून दीडशे मिनिटे वेगाने चालले पाहिजे. हे ही जमले नाही तर किमान ७५ मिनिटांचा वेगाने चाललेच पाहिजे. 

एका जागी बसणं त्यात जंक फूडचा ओव्हरडोस राहिल्यास माणूस पन्नाशीही पार करेल की नाही याबाबत शंका आहे. शतायुषी व्हायचे असेल तर जास्तीत जास्त एकाच जागी बसणे टाळा. अन्यथा एका जागी बसाल तर मरण तुम्हाला नक्कीच गाठेल, अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे.