close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

चंद्रपूर येथे वाघ मृतावस्थेत आढळला

चंद्रपूर जिल्ह्यात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. 

Updated: Aug 24, 2019, 09:28 PM IST
चंद्रपूर येथे वाघ मृतावस्थेत आढळला

चंद्रपूर : जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील जुना पोडसा येथील शेतात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. या वाघाची शिकार केल्याची कुजबूज सुरु असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच मध्य चांदा वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

मध्य चांदा वनविभाग वनपरीक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या जुना पोडसा येथील चनकापुरे नामक शेतकऱ्याच्या शेतात हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. मात्र, वाघाचा मृत्यू खूप दिवस आधी झाल्याचे समजते आहे. त्यामुळे वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. तीन-चार दिवसांपूर्वी या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागानं व्यक्त केला आहे. पुराच्या पाण्यात अडकून याचा मृत्यू झाला असावा, अशीही शक्यताही व्यक्त केली जात आहे.