निलेश खरमरे, झी मिडिया, भोर : जिवंत बिबट्यांची तस्करी करण्याचा प्रकार भोर येथे उघड झाला आहे. खेड शिवापूर टोल नाक्यावर वाहन तपासणी करत असताना राजगड पोलिसांनी जिवंत बिबट्याची तस्करी करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या तिघांना इनोव्ह सह ताब्यात घेतले. राजगड पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. आरोपींकडे तीन ते चार महिन्याची दोन बिबट्याची पिल्ले आढळली आहेत. सोमवारी दुपारी गाड्यांची तपासणी चालू असताना हा प्रकार समोर आला.
पुण्याचा दिशेने जात असलेल्या MH12 RF 1000 या इनोव्हा गाडीत मोठ्याने आवाज येत होता. गाडीमध्ये संशयास्पद हालचाली सुरू होत्या. गाडीची तपासणी केली असता पिंजऱ्यात नर जातीचा आणि बकेटमध्ये मादी अशी दोन पिल्ले आढळली. याप्रकरणी मुन्ना सय्यद, इरफान शेख, आयाज पठाण यांचा यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तर बिबट्याच्या पिलांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.