अभिषेक अदेप्पा, झी मीडिया, सोलापूर : सोलापूर (Solapur Crime) शहरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. फाटलेला शर्ट शिवण्याचा बहाणा करून घरात घुसलेल्या एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचर केला आहे. नराधम फाटलेला शर्टचा बहाणा करत घरात कोणी नसल्याचं पाहून घरात शिरला. त्यानंतर घराचे दार बंद करुन आरोपीने नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. या घटनेमुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Solapur Police) आरोपीला अटक केली आहे.
या धक्कादायक प्रकारानंतर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ तपास करुन नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरु केला आहे. पीडित मुलीची आई कामासाठी बाहेर गेली असतानाच आरोपीने संधी साधत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे.
शनिवारी हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. फाटलेला शर्ट शिवायचा आहे असे सांगून शेजारीच राहणारा आरोपी घरात शिरला होता. त्यानंतर दरवाजा बंद करून मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. दुपारच्या दरम्यान पीडितेची आई घरी आल्यानंतर मुलीने घाबरून काही सांगितले नाही. मात्र रात्री दहा वाजता झोपेतून उठून तिने रडत सगळा प्रकार तिच्या आईला सांगितला. हा सगळा प्रकार ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. आईने पोलीस ठाणे गाठत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
घटनेचे गांभीर्य ओळखत मुलीच्या कुटुंबियांनी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गाठले आणि सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे.
दरम्यान, पीडित मुलगी आणि तिची आई घरी शिलायचे काम करते. यासोबत मजुरी करुन पीडितेची आई घर चालवत आहे. काही वर्षांपूर्वीच मुलीच्या वडिलांचे निधन झाले होते.