सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीत भाविकांची गर्दी

सोमवती अमावस्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपर्यातून 2  लाखा पेक्षाही जास्त भाविकांनी जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली. देवाच्या कऱ्हा नदितील स्नानानंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरू होतो. 

Updated: Aug 21, 2017, 07:41 PM IST
सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीत भाविकांची गर्दी title=

जेजुरी : सोमवती अमावस्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपर्यातून 2  लाखा पेक्षाही जास्त भाविकांनी जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली. देवाच्या कऱ्हा नदितील स्नानानंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरू होतो. 

धालेवाडी इथल्या बाबीरबुआच्या मंदिराला शिडाची भेट देऊन पालखी सोहळा जानाई देवीच्या मंदिरात विसावून रात्रीच्या पहिल्या प्रहारास गडावर प्रवेश करते. भंडार गृहामध्ये मूर्ती स्थापित केली जाते. त्यानंतर खांदेकरी, मानकरी मंडळींना देवाच्या शेतामध्ये पिकलेलं मूठभर धान्य रोजमुरा म्हणून दिलं जातं.  

त्यानंतर सोमवती पालखी सोहळ्याची सांगता होते. दरम्यान, पालखी सोहळा ज्या रस्त्यानं क-हा तीरावर स्नानासाठी जातो. त्या रस्त्याची पालिका प्रशासनानं डागडुजी न केल्यानं भाविकांमध्ये नाराजी दिसून आली.