ग्लासखाली फोडला सुतळी बॉम्ब, 14 वर्षाच्या मुलाला गमवावे लागले प्राण!

फटाके उठले जीवावर, धुळ्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना

Updated: Oct 26, 2022, 12:22 AM IST
ग्लासखाली फोडला सुतळी बॉम्ब, 14 वर्षाच्या मुलाला गमवावे लागले प्राण! title=

धुळे : देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र काही ठिकाणी फटाक्यांमुळे लहान मुलांना भाजल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशाच प्रकारे धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील आदिवासी वस्तीतील एका 14  वर्षांच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. सोनू जाधव असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. 

नेमकं काय घडलं? 
सोनूने फटाके वाजवताना सुतळी बॉम्ब स्टंट करत फोडायला गेला मात्र हा स्टंट त्याच्याच अंगलट आला. सुतळी बॉम्ब फोडताना त्यानं त्यावर स्टीलचा ग्लास ठेवला. सुतळी बॉम्ब फुटल्यानं स्टीलच्या ग्लासचे तुकडे झाले आणि ते सोनूच्या शरीरात घुसले. यामध्ये सोनू गंभीर जखमी झाला होता मात्र तो काही वाचू शकला नाही. 

त्यामुळे घडल्या प्रकारावर शहरात चांगलीच चर्चा रंगली. पोलिसांनी याबाबत बोलायला नकार दिला आहे. मात्र या घटनेमुळे फटाके फोडताना लहान मुलांनी काळजी घेण्याचा मुद्दा समोर आलाय. 

पुण्यामध्येही एक चिमुकला फटाके फोडत असताना त्याचा चेहरा भाजल्याची धक्कादायक घटना समोर आली. त्यामुळे पालकांनी निष्काळजीपण न करता मुलांसोबत फटाके फोडताना असायला हवं. कारण छोटीशी चुकी संपूर्ण आयुष्यभर दृष्टी घालवू शकते. सर्वांनीच गोष्टीची काळजी घेत सणाचा आनंद घ्यावा.