आंगणेवाडी यात्रेकरुंसाठी मध्य रेल्वेची खुशखबर...

कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रेसाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते...

Updated: Jan 5, 2018, 01:33 PM IST
आंगणेवाडी यात्रेकरुंसाठी मध्य रेल्वेची खुशखबर...  title=

सिंधुदुर्ग : कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रेसाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते...

हे पाहता मध्य रेल्वेने कोकण मार्गावर विशेष चार फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

एलटीटी आणि सीएसटी ते सावंतवाडी रोड दरम्यान या गाड्या चालविण्यात येणार असून ७ जानेवारीला गाड्यांचे बुकींग सुरु करण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. 

त्यामुळे भराडीदेवीच्या जत्रेला कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

विषेश गाड्या कुठून आणि कधी सुटणार?

- ०११६१ ही गाडी २६ जानेवारीला एलटीटी स्थानकातून मध्यरात्री १.१० वाजता सुटणार

- २६ जानेवारीला ०११६२ ही गाडी सावंतवाडी रोड स्थानकातून दुपारी १२.३० वाजता रवान होणार

- ०११५७ सीएसएमटी - सावंतवाडी ही गाडी २७ जानेवारीला सीएसएमटी स्थानकातून मध्यरात्री ००.२० वाजता

- ०११५८ ही गाडी २७ जानेवारीला दुपारी २ वाजता सावंतवाडी इथून रवाना होणार

- या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ रेल्वे स्थानकांवर पकडता येतील