दहावीच्या विद्यार्थ्यांनो सज्ज व्हा! निकालाच्या तारखेसंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी दिलीय अपडेट

10th Result Date: बारावी निकालानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढू लागली आहे. दहावीचा निकाल कधी? असा प्रश्न विचारला जात आहे. 

Pravin Dabholkar | Updated: May 21, 2024, 06:29 PM IST
दहावीच्या विद्यार्थ्यांनो सज्ज व्हा! निकालाच्या तारखेसंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी दिलीय अपडेट title=
10 Result Date

10th Result Date: महाराष्ट्र बोर्डाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारलीये....यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागलाय.. यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारलीये. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागलाय.. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. दरम्यान आता दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढू लागली आहे. दहावीचा निकाल कधी? असा प्रश्न विचारला जात आहे. 

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येईल, असेही सांगितले. दरम्यान त्यांना यावेळी दहावी निकालासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. 

बारावीत कमी गुण मिळाले? टेन्शन नको! शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

दहावीचा निकाल कधी? या प्रश्नावर बोलताना दहावीचा निकाल 27 मेच्या आधी लागेल अशी माहिती केसरकर यांनी दिली. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in वर निकाल पाहता येणार आहे. तसेच एसएमएस आणि डिजीलॉकरच्या मदतीनेदेखील तुम्ही निकाल पाहू शकता.

बारावीत शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या तनिशाने सांगितलं यशाचं गुपित