Ahmednagar : एसटीत गळफास घेत चालकाची आत्महत्या

 Suicide News : संगमनेर शहरातील एसटी स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली.  

Updated: Sep 21, 2021, 11:43 AM IST
Ahmednagar : एसटीत गळफास घेत चालकाची आत्महत्या

अहमदनगर :  Suicide News : संगमनेर शहरातील एसटी स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली. (ST Bus Driver Suicide in Sangamner) बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी साडे सहाच्या सुमारास संगमनेर बसस्थानकात उभ्या असलेल्या पाथर्डी-नशिक या बसमध्ये चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच उघड झाले आहे. 

एसटीमधील डिझेल संपल्याने गाडी रात्री संगमनेरलाच थांबलेली होती. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) हे एसटी चालक होते. त्यांच्या डोक्यावर कर्ज वाढल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहीती मिळळत आहे. पोलिसांनी गाडीमधून मृतदेह बाहेर काढुन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला असुन पुढील तपास सुरु केला आहे.

पाथर्डी डेपोचे एसटीचे वाहक यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी मिळाली आहे. यावरुन त्यांच्या डोक्यावर कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, यामध्ये कोणालाही जबाबदार धरणारा उल्लेख नसल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.  

चालक तेलोरे यांचा मृतदेह बसमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रवाशांना उभे राहताना पकडण्यासाठी बसच्या छताला जो बार लावलेला असतो, त्याला सुती दोरीच्या सहायाने तेलोरे यांनी गळफास लावून घेतल्याचे आढळून आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.