मोसमातील पहिला आंबा मुंबई, पुण्यात न येता थेट सांगलीत पोहचला; हंगामापूर्वीच बाजारात दाखल

मोसमातील पहिला बाजारात दाखल झाला आहे. सांगलीच्या बाजारपेठेत हा आंब्याची पहिली पेटी आली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 1, 2024, 05:24 PM IST
मोसमातील पहिला आंबा मुंबई, पुण्यात न येता थेट सांगलीत पोहचला; हंगामापूर्वीच बाजारात दाखल title=

Hapus Mango From Devgad : फळांचा राजा म्हणजे आांबा. वर्षातून चारच महिने हापूसची चव चाखता येते. मार्च महिन्यात आंब्याचा खरा सिजन सुरु होता. यंदा मात्र, ऐन थंडीतच हापूस बाजारात आला आहे. मोसमातील पहिला आंबा मुंबई, पुण्यात न येता थेट सांगलीत पोहचला आहे. कुणकेश्वर येथून देवगड हापूसची पहिली पेटी  सांगलीला रवाना झाली आहे. 

हे देखील वाचा... महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण; सातपुडा पर्वतात रांगेतील छुपं पठार, खास सुर्योदय पाहण्यासाठी येतात पर्यटक

सांगलीच्या बाजारात फळांचा राजा दाखल झाला आहे. हंगामापूर्वीच सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देवगडचा आंबा पोहोचला आहे. कुणकेश्वर येथील शेतक-याचा एक डझनच्या पेटीला अडीच हजार रुपये भाव मिळालाय. सध्या दोन पेट्यांची आवक झालीये. सांगलीमध्ये देवगड हापूसची मागणी वाढली आहे. 

देवगड तालुक्यातील कुणकेश्वर वरची वाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी आपल्या आंबा बागायतीतील हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी मार्केटला पाठविल्या असून या  पाठविलेल्या देवगड हापूसच्या एक डझनच्या एका पेटीला 2500 इतका दर मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

हवामानात सातत्याने वारंवार होणारा बदलामुळे चांगल्या पद्धतीने आंबा पीक घेणे आज शेतकऱ्यांना कठीण बनले आहे. कारण उत्पादनापेक्षा कीटकनाशकांच्या औषध फवारणीसाठी खर्च केला जातो आणि यामध्येच हापूस आंबा पीक घेणे व ते टिकवणे हे खूप कठीण बनत चालले आहे. अशातच देवगड तालुक्यातील कुणकेश्वर वरचीवाडी येथील नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी आपल्या बागेतील हापूस आंब्याच्या कलमांना श्रावण महिन्यापासून मोहोर येऊ लागला होता. हवामानाच्या बदलामुळे हा मोहोर  गळून देखील बऱ्याच वेळा पडला. मात्र आलेला मोहोर टिकवण्यासाठी या दोन बंधूंची धडपड होती. 

यात त्यांना यशही आले त्यांनी आपल्या बागेतील मोहोर टिकावा यासाठी नियोजन पद्धत कीटकनाशकांची फवारणी करत आंबा पिक जपण्याचा प्रयत्न केला . यावर्षीच्या देवगड हापूसच्या हंगामातील देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी नोव्हेंबर महिन्यातच  पाठविण्याचा मान कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार धुरी यांना मिळाला आहे. 

यावर्षी त्यांनी एक एक डझनच्या देवगड हापूसच्या दोन पेट्या त्यांनी सांगली येथील एमएबी यांच्या पेढीवर पाठविल्या असून यातील एका डझनच्या पेटीला 2500 असे दोन हापूसच्या पेटींना पाच हजार रुपये दर मिळाला असल्याचे यावेळी धुरी यांनी सांगितले. दोन महिने अगोदरच देवगड हापूस दाखल झाल्यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजारपेठेत देवगड हापूसची मागणी वाढलेली दिसत आहे.