एसटीमधील कर्मचाऱ्याची आत्महत्या, दोन महिने पगार नसल्याने कुटुंबाची उपासमार

कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन सुरु आहे. तसेच कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्हाअंतर्गतही एसटीची सेवा बंद आहे. 

Updated: Jul 31, 2020, 03:12 PM IST
एसटीमधील कर्मचाऱ्याची आत्महत्या, दोन महिने पगार नसल्याने कुटुंबाची उपासमार  title=

सांगली : कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन सुरु आहे. तसेच कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्हाअंतर्गतही एसटीची सेवा बंद आहे. गेले चार महिने एसटी बंद असल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे पगारही झालेले नाहीत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. इस्लामपूर आगारातील मेकॅनिक अमोल माळी (३५) याचाही दोन महिने पगार झाले नव्हता. त्यामुळे तो संटकात होता. त्याने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

कर्जबाजारी आजारी शेतकऱ्याची आत्महत्या

 सांगली जिल्ह्यातील पेठ येथील अमोल धोंडीराम माळी या एसटी कामगाराने गुरुवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तो इस्लामपूर आगारात मेकॅनिकल विभागात नोकरीस होता. त्याने आर्थीक परिस्थितीमुळे आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना संसर्गामुळे सुरु असलेल्या लॉकडाउन काळात एसटी  आगार चार महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारही झालेले नाहीत. त्यामुळे हजारो एसटी कर्मचाय्रांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

अमोल माळी याच्याच पगारावरच कुटुंबाचा उदर्निवाह सुरु होता. मात्र पगार न मिळाल्याने  तो आणि पत्नी इतर ठिकाणी मजुरी करुन घर खर्च चालवत होते. तो गेल्या काहि दिवसापासून आर्थिक संकटात होता. यातूनच त्याने आपली जिवन यात्रा संपवल्याची चर्चा आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, ५ वर्षांचा मुलगा, ३ वर्षांची मुलगी असा परिवार आहे.