एसटी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपावर जाण्याचा इशारा

आपल्या मागण्यांसाठी एसटी कर्मचारी १४ जानेवारीपासून पुन्हा संपावर जातील, असा इशारा इंटक संघटनेकडून देण्यात आला. 

Updated: Nov 18, 2017, 01:46 PM IST
एसटी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपावर जाण्याचा इशारा title=
संग्रहित छाया

औरंगाबाद : आपल्या मागण्यांसाठी एसटी कर्मचारी १४ जानेवारीपासून पुन्हा संपावर जातील, असा इशारा इंटक संघटनेकडून देण्यात आला. 

२२ डिसेंबरपर्यंत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करा, अन्यथा कर्मचारी यावेळी संपूर्ण तयारीनिशी आंदोलन करेल, अशी भूमिका इंटक संघटनेकडून घेण्यात आली. औरंगाबादेत संघटनेच्या पुढील वाटचाली विषयी बैठक घेण्यात आली. 

या बैठकीत आपल्या मागण्यांबाबत विचार मंथन करण्यात आले.  दिवाळीच्या काळात बस कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला होता. या काळात सरकारकडून योग्य पावलं उचलले गेले नाहीत न्यायालयाने निर्देश देऊनही अद्याप सरकारने मागण्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही, असा आरोप करण्यात आलाय.

तसेच सरकारने न्यायालयाच्या निर्देशांना देखील केराची टोपली दाखवली. त्यामुळे आता सरकारला जाब विचारला जाईल २२ डिसेंबरपर्यंत सरकारने भूमिका स्पष्ट न केल्यास संक्रातीच्या दिवशीच बस कर्मचारी आपले आंदोलन सुरु करेल, असा इशारा इंटक संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला.