Ayodhya Ram Mandir holiday: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्याची जय्यर तयारी सुरु होती. या सोहळ्यानिमित्ताने सरकारने देशभरात सुट्टी जाहीर केली होती. सर्व शाळा तसेच सरकारी कार्यालयासांठी सुट्टी देण्यात आली. सुटीचे परिपत्रक देखील जाहीर करण्यात आले होते. शासनाचे नियम धाब्यावर बसवत अमरावतीमधील सेंट फ्रान्सिस शाळेने शाळा भरवली. मात्र, भाजप कार्यकर्त्यांनी शाळा बंद पाडली.
अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने देशभर आनंदाचे वातावरण आहे. या आनंदात सर्वांना सहभागी होता यावे यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने देखील सर्व शाळा महाविद्यालय व शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर केली. मात्र, असे असतानाही बडनेरा येथील सेंट फ्रान्सिस शाळेने मात्र शासनाचे नियम धाब्यावर बसबत विद्यार्थ्यांना सुट्टी न देता विद्यार्थी शाळेत बोलवले ही बाब भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांना माहीत होताच त्यांनी शाळेत जाऊन शाळेचे फादर व शिक्षक यांना चांगलेच खडसावले. यानंतर मात्र शाळेचे फादर आणि शिक्षक यांच्यात यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली अडून यानंतर शाळेला सुट्टी जाहीर केली. शाळेने सुटी न देण्याच्या या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 22 जानेवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्यानंतर या सुट्टीला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. कायद्याच्या चार विद्यार्थ्यांनी सार्वजनिक सुट्टीला याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. ही सुट्टी मनमानी असून राज्य सरकारच्या अधिकारात नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. मात्र, कोर्टात येणाऱ्या याचिकाकर्त्याने केवळ स्वच्छ हातानेच नाही तर स्वच्छ मनाने यावं या शब्दांत कोर्टाने फटकारलं. सुट्टीचा निर्णय धोरणात्मक असून सरकारला सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार असल्याचं कोर्टाने म्हटल.
मुंबई विद्यापीठाच्या 14 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा असल्यानं राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीय. त्यामुळे 22 तारखेला होणा-या 14 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.या परीक्षा 31 जानेवारीला होतील. 22 जानेवारीला मुंबई विद्यापीठाच्या BA, B.COM, MA, LLB, BMS, MBA साठी परीक्षा होणार होता. आता त्या परीक्षा 31 जानेवारीला होतील.