विकास भदाणे, झी २४ तास, चाळीसगाव, जळगाव : चाळीसगाव तालुक्यातल्या पिलखोड गावात दहा वर्षांच्या मुलीच्या डोळ्यात दोन दिवसांपासून २० ते २१ खडे निघाल्याची धक्कादायक घटना घढलीय. श्रद्धा पाटील या चौथीत शिकणाऱ्या मुलीच्या डोळ्यातून हे मोठ्या आकाराचे खडे बाहेर आल्याने तिला वैद्यकीय उपचार सुरू झालेत. नेत्ररोग तज्ज्ञ अमित महाज यांनी उपचार सुरू केलेत. मुलीच्या डोळ्यांना संसर्ग झाल्यामुळे डोळ्यात टाकण्यासाठी औषधं दिली आहेत. मुलीचा डोळा थोडाचा दाबला असता डोळ्यातून खडे येत आहेत.
श्रद्धाच्या या आजारानं डॉक्टरांसह अनेकांना चक्रावून टाकलंय. या मुलीची वार्ता समजल्यानंतर गावातील रहिवाशांनी तिला पाहण्यासाठी एकच गर्दी केलीय. चमत्कार की डोळ्यांचा आजार, अशी चर्चाही इथं सुरू आहे. चाळीसगाव येथील नेत्र रोग तज्ज्ञ डॉक्टर अमित महाजन यांनी मात्र हा काही चमत्कार नसून मुलीच्या डोळ्यांना इन्फेक्शन झाल्याचं स्पष्ट केलंय.
वडील राधेश्याम पाटील आणि आई ज्योती पाटील यांच्या म्हणण्यानुसार, श्रद्धा खेळत असताना तिच्या डोळ्यांतून तीन-चार खडे बाहेर पडले. अगोदर या दोघांनाही यावर विश्वास बसत नव्हता... परंतु, त्यांनी त्वरीत डॉक्टरांना गाठल्यानं श्रद्धाच्या डोळ्यांवर वेळेवर उपचार सुरू झालेत.