सदाभाऊ खोत गाडीवर आणि ताफ्यावर दगडफेक

सदाभाऊ खोत हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ही दगडफेक केल्याचं बोललं जातं आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 24, 2018, 03:03 PM IST

सोलापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर आणि ताफ्यावर दगडफेक झाली आहे. सदाभाऊ खोत हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ही दगडफेक केल्याचं बोललं जातं आहे. 

निषेध करण्यासाठी दगडफेक

सदाभाऊ खोत यांचा निषेध करण्यासाठी ही दगडफेक करण्यात आल्याची शक्यता आहे. मका, गाजर आणि शेती उत्पादन वस्तूंचा खोत यांच्या गाडीवर मारा करण्यात आल्याचं समजतं आहे.