'माझ्या मुलीची बदनामी बंद करा', पूजाच्या वडिलांना अश्रू अनावर

पूजा आत्महत्या प्रकरणाला नवं वळणं मिळाल्यानंतर 'झी 24 तास'वर पूजाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया.  

Updated: Feb 15, 2021, 07:27 AM IST
'माझ्या मुलीची बदनामी बंद करा', पूजाच्या वडिलांना अश्रू अनावर  title=

बीड : बीडच्या परळी येथील रहिवासी पूजा चव्हाण हीने पुण्यात आत्महत्या केली आणि संबंध महराष्ट्रभर त्यावरून विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र तिच्या आकस्मित जाण्याने तिच्या कुटुंबाला फार मोठा धक्का बसला आहे. आजपर्यंत तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यानं माध्यमांशी बातचीत केली नव्हती .मात्र पहिल्यांदाच पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. माझ्या मुलीची बदनामी मीडियाने थांबवावी, असं सांगत असताना त्यांना अश्रू अनावर झाले.
 
सध्या पूजाची हत्याकी आत्महत्या असा देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, टिक टॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती हाती आलीय. वानवडीतल्या हेवन पार्क सोसायटी इमारतीतून ८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री दीड वाजता पूजा खाली पडली, त्याआधी तिनं मद्यप्राशन केलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पोलिसांनी पूजाचा भाऊ विलास चव्हाण आणि त्याचा मित्र अरुण राठोड यांचे जबाब नोंदवलेत. पूजाच्या रुममध्ये दारुच्या बाटल्या सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. वानवडी पोलिसांनी याआधीच पूजाच्या आईवडिलांचा जबाब नोंदवलाय... याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिलेत.