व्हिडिओ: सिंधुदुर्गात वादळ सदृश्य स्थिती

Updated: Apr 22, 2018, 09:36 PM IST

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील वातावरण कमालीचे बदलले असून, समुद्र आणि शहर परिसरात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालीय..... महाकाय लाटा किना-यावर आदळतायत.... या वादळाचा सर्वाधिक फटका मालवण किना-याला बसलाय.... त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय....  समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं ही परिस्थिती निर्माण झालीय.... सिंधुदुर्गात आज आलेल्या या अचानक समुद्री उधाणानं मच्छिमारांची चांगलीच धांदल उडाली....    मालवण चिवला बीच, मेढा, वायरी, दांडी भागातल्या किनारपट्टीला लाटांची धडक बसतेय....