शाळेत जात नाही म्हणून आई ओरडली, विद्यार्थ्याने शाळेच्या आवारातच...

दहावीत शिकणारा हा मुलगा शाळेत जात नसल्याने आई त्याला ओरडली, पण आईचं ओरडणं त्याने फारच मनावर घेतलं

Updated: Nov 23, 2022, 06:50 PM IST
शाळेत जात नाही म्हणून आई ओरडली, विद्यार्थ्याने शाळेच्या आवारातच...  title=

निलेश खरमरे, झी मीडिया, भोर : पुण्यातील (Pune) भोर (Bhor) तालुक्यात एक धक्कादायक घटना (Shocking News) समोर आली आहे. भोर तालुक्याच्या दुर्गम डोंगरी हीडस मावळ खोऱ्यातील धानवली गावात एका अल्पवयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अथर्व लक्ष्मण धनवले असे मृत विद्यार्थ्याचं नाव आहे.

काय आहे नेमकी घटना?
अथर्व हा इयत्ता 10 वीत शिकत होता. आज पहाटेच्या सुमारास अथर्वने गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्हरांड्यातील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं ठोस कारण अद्याप समोर आलं नसलं तरी शाळेत का जात नाहीस म्हणून त्याची आई त्याला ओरडली होती. हाच राग मनात धरून अथर्वने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती तात्काळ पोलिासांना देण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटेच्यावेळी अथर्व घरात नसल्याचं त्याच्या आईच्या लक्षात आलं, तिने घरात सर्वत्र पाहिलं, पण अथर्व कुठेच सापडला नाही. शेजारी कोणाकडे गेला असेल म्हणून आजूबाजूला चौकशी केली. पण कोणालाच त्याचा पत्ता लागला नाही. शेवटी सर्वांनी मिळून त्याचा शोध घेतला. यावेळी गावातील शाळेच्या लोखंजी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत अथर्व आढळून आला. गावातील नागरिकांनी त्याला भोर इथं रुग्णालयात आणलं. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. 

अल्पवयीन विद्यार्थ्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस अधिक तपास करत आहेत.