...म्हणून विद्यार्थ्यांना द्यावा लागला फुटपाथवर पेपर

कोरोनामुळे सर्वांनाच मोठा फटका बसला आहे.  

Updated: Dec 27, 2020, 03:03 PM IST
...म्हणून विद्यार्थ्यांना द्यावा लागला फुटपाथवर पेपर title=

अमरावती : कोरोनामुळे सर्वांनाच मोठा फटका बसला आहे. अमरावती शहरातील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता ग्राउंड बंद केला. त्यामुळे खाजगी क्लासच्या शेकडो विद्यार्थ्यांना पोलीस भर्तीचा सराव पेपर चक्क फुटपाथवर द्यावा लागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आधी लेखी त्यानंतर ग्राऊंड पोलीस भर्तीच्या परीक्षेचे आदेश दिले. विद्यार्थी आता परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. म्हणून विद्यार्थी खाजगी शिकवणी वर्गाच्या माध्यमातून सराव करीत आहे. दरम्यान दर आठवड्याला या विद्यार्थ्यांचा सराव पेपर होतो.

परंतु कोरोना मुळे शिकवणी वर्ग बंद असल्याने सोशल डिस्टन्स ठेऊन ग्राऊंड सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. विद्यार्थ्यांचा सराव पेपर श्री शिवाजी शारीरिक महाविद्यालयाच्या ग्राऊंडवर होणार होता. पण सूचना न देता प्राचार्यांनी ग्राऊंड बंद केल्याने शेकडो विद्यार्थ्यांना रोडच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर पेपर देण्याची वेळ आली.