'पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष....', आणि सुनेत्रा पवार अडखळल्या! राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना काय घडलं?

Sunetra Pawar ON NCP National President: उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. 18 जून ही उमेदवारी अर्जाची शेवटची तारीख आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 13, 2024, 03:09 PM IST
'पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष....', आणि सुनेत्रा पवार अडखळल्या! राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना काय घडलं? title=
Sunetra Pawar ON NCP National President

Sunetra Pawar ON NCP National President: राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय...राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आलीय...यावेळी अर्ज भरताना राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते...दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.. त्यामुळे जर कुणी अर्ज दाखल न केल्यास सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून येण्याची शक्यताय. 

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. 18जून ही उमेदवारी अर्जाची शेवटची तारीख आहे. तोपर्यंत मला वाट पाहावी लागेल. राष्ट्रवादी पक्षाने मला राज्यसभेची उमेदवारी दिली. याबद्दल मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष....' असे म्हणून सुनेत्रा पवारांनी मोठा पॉझ घेतला. यानंतर काही क्षणात त्यांनी अजित पवार यांचे नाव घेतले. यामुळे सर्वजण त्यांच्याकडे पाहातच राहिले. राष्ट्रवादी पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच महायुतीच्या नेत्यांचे मी आभार मानते. जो विश्वास मला दाखवलाय त्या संधीचे मी सोनं करेन असे ते म्हणाले. 

कुणीही नाराज नाही

महायुतीच्या सर्व नेत्यांनी मिळून हा निर्णय घेतलाय. छगन भुजबळदेखील फॉर्म भरायला होते. त्यामुळे कुणीही नाराज नाही. लोकसभेवर जावे ही जनतेची मागणी होती. मी राज्यसभेवर जावे अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. असा आग्रह करु नये मी म्हणत होते. सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेची उमेदवारी घेतली पाहिजे असे पार्थ पवार यांनी स्वत: सांगितले होते. त्यांचादेखील हा आग्रह होता, असेही त्या म्हणाल्या.  

पाहा व्हिडीओ

महायुतीत अजित पवार पडले एकटे?

सुनेत्रा पवारांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा एकही नेता हजर नाही. सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्यासाठी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हजर असल्याचे दिसून आले.  महायुतीचे अनेक नेते मुंबईत हजर असतानाही विधानभवनात अर्ज भरण्यासाठी मात्र कुणीच हजर नाही. यामुळं महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचे दिसते.

कार्यकर्त्यांना आनंद

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर राज्यसभेच्या उमेदवारीचा शिक्कामार्फत होताच बारामती तालुक्यातील पवारांच्या काटेवाडीत फटाके फोडण्यात आले. गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आलाय. आमचा आनंद गगनात मावत नसल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिलीय.