Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यासाठी जवळपास 1 महिना लागला. त्यामुळे विरोधकांनी भरपूर टीका केली. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर ही काही आमदार नाराज असल्याची बातमी आली. तेच संपत नाही की पुन्हा खाते वाटपात हवं ते खातं न मिळाल्याने मंत्री नाराज असल्याची चर्चा रंगू लागली.
खातेवाटपातील नाराजीवरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी टीका केली. घरात बायको जेवढी रुसत नाही तेवढे हे मंत्री रुसत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. दुसरीकडे कमी महत्त्वाची खाती मिळाल्याने अनेक मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. यावरुनच सुप्रिया सुळे यांनी सरकारला टोला लगावला आहे.
अडीच वर्षात महाविकासआघाडीची सत्ता गेली. अडीच वर्षानंतर निवडणुका लागतील. पण शिंदे-भाजप सरकारमध्ये मंत्र्यांचे रुसवे-फुगवे सुरु आहेत. घरात बायको जेवढी फुगत नसेल तेवढे मंत्री रुसत असल्याचा टोला त्यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना लगावला.
सरकारमधील मंत्र्यांनी मात्र कोणतीही नाराजी नसल्याचं म्हटलं आहे. पण यामुळे विरोधकांना टीका करायची आयती संधी मिळाली आहे.