शिंदे गटाचे 40 आमदार भाजपमध्ये घ्यायचे आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस.... सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस यांना शिंदे गटाचे 40 आमदार भाजपमध्ये घ्यायचे आहेत  असा दावा देखील सुषमा अंधारे यांनी केला आहे. माझ्यावर आरोप करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे अशी टीका देखील सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्या पंढरपुर येथे बोलत होत्या.

Updated: Dec 25, 2022, 05:57 PM IST
शिंदे गटाचे 40 आमदार भाजपमध्ये घ्यायचे आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस.... सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप title=

Maharashtra Politics:   ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare ) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. भाजपच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करतोय. देवेंद्र फडणवीस यांना शिंदे गटाचे 40 आमदार भाजपमध्ये घ्यायचे आहेत  असा दावा देखील सुषमा अंधारे यांनी केला आहे. माझ्यावर आरोप करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे अशी टीका देखील सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्या पंढरपुर येथे बोलत होत्या.

भाजपात शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे हे मुख्यमंत्री एकनाथभाऊ शिंदे यांना समजत नाही. शिंदे गट संपवण्याचा  भाजपाचा पर्यायने देवेंद्रजींचा ट्रॅप आहे. फडणवीस यांना शिंदे गटाचे 40 आमदार भाजपमध्ये घ्यायचे आहेत असे सुषमा अंधारे म्हणाल्या. 

भाजप पक्ष वाढवायचा आणि मग थेट मोदींच्या पंतप्रधान पदावर दावा ठेकायचा. मोदींच्या पंतप्रधान पदावर दावा ठोकून देवेंद्र फडणवीस कधी पंतप्रधान होतील. हे कळणार नाही याची माहिती पक्षांतर्गत देखील आहे. अशी खोचक टिपण्णा शिवसेना उप नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. 

माझ्यावर टीका करणारे कीर्तनकार वारकरी सांप्रदायिक हे खरे वारकरी आहेत तर ते मोहन भागवत सांप्रदायाचे वारकरी , कीर्तनकार, प्रहसनकार आहेत पेड कीर्तनकार आहेत. अशी टीका देखील वारकरी संप्रदायाच्या आंदोलनावर अंधारे यांनी केली. मोहन भागवत सांप्रदायाचे वारकरी , कीर्तनकार, प्रहसनकार आहेत पेड कीर्तनकार आहेत. पंधरा वर्षानंतर ती क्लिप व्हायरल करतात. आता काही प्रश्न विचारले जातात त्याचे उत्तर त्यांना देता येत नाहीत, अशी टीका वारकरी संप्रदायाच्या आंदोलनावर अंधारे यांनी केली

संत एकनाथ महाराज आणि वारकरी संप्रदायासंदर्भात अंधारे यांचे वादग्रस्त विधान 

अंधारे यांनी एका भाषणादरम्यान संत एकनाथ महाराज आणि वारकरी संप्रदायासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी माफी देखील मागितली. सच्च्या वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागते असं म्हणत अंधारे यांनी जाहीर मागी मागितली होती.