दूध दरवाढ मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २१ जुलै रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन पुकारले आहे.   

Updated: Jul 17, 2020, 03:24 PM IST
दूध दरवाढ मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक title=

मुंबई : दूध दरवाढ मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २१ जुलै रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची महत्वपूर्ण घोषणा राजू शेट्टी यांनी केली . दरम्यान कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव पाहता सर्व नियमांचे पालन करून हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. 

दूधावरील GST मागे घ्यावा, राज्य सरकारने शेतकऱ्यांना ५ रूपये अनुदान द्यावं, निर्यात अनुदान ३० रूपये द्यावं इत्यादी मागण्यासह हे आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा वगळता राज्यात इतरत्र १८ ते २० रुपये लीटरने दूध खरेदी केलं जातं असल्यामुळे स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली आहे. 

'आम्ही कोणालाही जबरदस्ती करत नाही पण आम्हाला आमचं दूध विकायचं नाही आणि दूध संकलन करायचं नाही अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे दूध उत्पादकांनी सहकार्य करावं.  दूध संघांनी देखील दूध संकलन बंद करावी आणि आंदोलनाला सहकार्य करावं. ' असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं.