देशातील सर्वात 'जलद स्वच्छता मोहिम' जळगावात

जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे सध्या जळगाव महापालिका आयुक्तपदाचा प्रभार आहे.

Updated: Jul 22, 2017, 04:35 PM IST
देशातील सर्वात 'जलद स्वच्छता मोहिम' जळगावात title=

जळगाव : जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे सध्या जळगाव महापालिका आयुक्तपदाचा प्रभार आहे. या दरम्यान जळगाव शहरातील सर्वात महत्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या गोलाणी मार्केटमध्ये, प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर यांनी स्वच्छता मोहिम राबवली, या मोहिमेत त्यांनी दीडशे टन कचरा काढला.

सकाळी साडेपाचपासून ५५० सफाई कर्मचारी कामाला लागले, त्यांनी १ हजार ९० गाळ्यांमधून १५० टन कचरा बाहेर काढला, हे देशातील सर्वात मोठी जलद गतीने राबवण्यात येणारी सफाई मोहिम असावी.

जलद मोहिम का?

या मोहिमेत १० तासात १५० टन कचरा काढण्यात आला, शहरातील मध्यभागी असणारे व्यापारी संकूल यामुळे चकाचक झाले आहे.

देशातील सर्वात जलद स्वच्छता मोहिम अशी राबवण्यात आली...

व्यापारी संकूल संख्या १
व्यापारी संकुलातील एकूण गाळे १ हजार ९०
रहिवासी गाळे ८०
एकूण ट्रॅक्टर ७८ कचरा जमा
०४ घंटागाड्या
०४ पिकअप व्हॅन
५५० कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहिम
मोहिमेची वेळ सकाळी ६ ते दुपारी ४

साडेपाचशे कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:च्या पैशांनी केळी खाऊ घातली, कामगारांची काळजी घेण्याची भूमिकाही यावेळी किशोरराजे यांनी दाखवली.

यावेळी व्यापारी संकुलनातील बेकायदेशीर जाहिराती काढण्यात आल्या, लोंबकळणाऱ्या वायरी व्यवस्थित करण्यात आल्या. थेट तिसऱ्या मजल्यावर सायकल नेणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली.