ताडोबातील बफरझोनकडे माधुरी आणि शर्मिलीमुळे पर्यटकांचा मोर्चा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा कोअर एरिया म्हणजे वाघांचं नंदनवन...त्यामुळे या भागाला पर्यटक अधिक पसंती देतात.. मात्र सध्या पर्यटकांनी कोअर एरिया ऐवजी बफरझोनकडे आपला मोर्चा वळवलाय..पाहूया हा रिपोर्ट..

Updated: Jan 8, 2018, 11:23 AM IST
ताडोबातील बफरझोनकडे माधुरी आणि शर्मिलीमुळे पर्यटकांचा मोर्चा

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा कोअर एरिया म्हणजे वाघांचं नंदनवन...त्यामुळे या भागाला पर्यटक अधिक पसंती देतात.. मात्र सध्या पर्यटकांनी कोअर एरिया ऐवजी बफरझोनकडे आपला मोर्चा वळवलाय..पाहूया हा रिपोर्ट..

पर्यटकांची गर्दी

जंगलाचा बफरझोन म्हणजे पर्यटकांचा तसा दुर्लक्षित भाग.. या भागात क्वचीतच व्याघ्रदर्शन घडतं.. मात्र सध्या पर्यटकांनी आपला मोर्चा ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचा बफरझोनकडे वळवलाय...त्याला कारण आहे माधुरी आणि शर्मिली.. ताडोबातल्या या दोन वाघीणी व्याल्यात.. यातल्या शर्मिलीला तीन बछडे आहेत तर माधुरीला चार.. या दोनही वाघिणी सध्या ताडोबाच्या बफरझोनमध्ये वावरताहेत.. त्यामुळे एरव्ही व्याघ्र दर्शनासाठी कोअर एरिया पालथा घालणारे पर्यटक आता बफरझोनलाच अधिक पसंती देऊ लागलेत.. 

माधुरी आणि शर्मिलीमुळे आकर्षण वाढलं

जय वाघाचं अचानक गायब होणं.. गेल्याकाही दिवसांपासून वाघांच्या मृत्यूच्या घटना वाढणं.. यामुळे वनविभाग आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पावर अवकळा पसरली होती.. मात्र माधुरी आणि शर्मिली या दोन लोकुरवाळ्या वाघीणी आणि त्यांच्या पिलावळीच्या आगमनानं व्याघ्रप्रकल्प पुन्हा श्रीमंत झालाय.. आता गरज आहे ती निसर्गाच्या या सौंदर्याच्या रक्षणाची..