ब्लाउज वेळेवर शिवला नाही म्हणून टेलरला 15 हजार रुपयांचा दंड; मोफत ब्लाऊज शिवून देण्याची शिक्षा

वेळेवर ब्लाउज शिवून न देणे एका महिला टेलरला चांगलेच महागात पडले आहे. वेळेवर ब्लाउज शिवला नाही म्हणून टेलरला 15  हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.  तसेच मोफत ब्लाऊज शिवून देण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jul 31, 2024, 07:34 PM IST
ब्लाउज वेळेवर शिवला नाही म्हणून टेलरला 15  हजार रुपयांचा दंड; मोफत ब्लाऊज शिवून देण्याची शिक्षा  title=

Dharashiv News :  ब्लाउज वेळेवर शिवला नाही म्हणून धाराशीवच्या एका महीला टेलरला ग्राहकमंचाने चांगलाच दणका दिला आहे. या महिला टेलरला  15 हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला. तसेच मोफत ब्लाऊज शिवून देण्याची शिक्षा देण्यात आली. सध्या धारशिवमध्ये या वेगवेगळ्या प्रकरणाची चांगलीच चर्चा आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

ॲडव्हान्स पैसे घेऊनही वेळेत ब्लाऊज शिऊन न दिल्याने धाराशिवच्या टेलर महिलेला तब्बल 15 हजार रुपयांचा दंड ग्राहक तक्रार निवारण मंचने ठोठावला आहे. तसेच राहिलेला ब्लाऊज मोफत शिऊन देण्याची शिक्षाही सुनावली आहे. स्वाती प्रशांत कस्तुरे यांनी जानेवारी 2023 मध्ये शहरातील नेहा संत या टेलरिंगचे दुकान चालवणाऱ्या महिलेकडे वर्कचे दोन ब्लाऊज शिवण्यासाठी दिले होते. 

यासाठी एकूण 6 हजार 300 रुपये बिलापैकी 3 हजार रुपये ॲडव्हान्स दिले होते. नेहा संत यांनी वेळेवर ब्लाऊज शिवून दिला नाही. फोन, मेसेजद्वारे पाठपुरावा केल्यानंतरही ब्लाऊज मिळत नसल्याने 28 एप्रिल 2023 रोजी कस्तुरे यांनी ॲड.प्रशांत कस्तुरे यांच्यामार्फत ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल केली. 

दरम्यान मंचाने बजावलेल्या नोटिसीला प्रतिसाद न देता नेहा संत या सुनावणीला गैरहजर राहिल्याने 15 जुलै 2024 रोजी ग्राहक मंचाने एकतर्फी आदेश पारित करीत नेहा संत यांना 10 हजार रुपये दंड तसेच तक्रारीचा खर्च म्हणून 5 हजार रुपये स्वाती कस्तुरे यांना देण्याचा आदेश दिला आहे. 

धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई; 1 कोटी रुपयांचा गांजा केला जप्त

धाराशिव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 1 कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.  विशाखापट्टणम येथून धाराशिव मार्गे सोलापूरला गांजा घेवून जात असताना ही कारवाई केली.  एका आरोपीला अटक करण्यात आलून इतर आरोपी फरार झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा व नळदुर्ग पोलिसांनी संयुक्त रित्या ही कारवाई केली. 
1 कोटी रुपयांचा 524 किलो गांजा जप्त केला. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ निलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाई. 7 पैकी 6 आरोपी झाले फरार सोलापूर येथील अतिश माने या आरोपीला पोलिसांनी पकडले तर इतर आरोपी फरार झाले आहेत. पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असुन फरार आरोपींचा शोध सुरु आहे, आजवरची ही मोठी कारवाई असुन 1 कोटी गांजा व एक स्कर्पिओ असा 1 कोटी 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.