पाचगणीत खोटी कागदपत्रे तयार करुन गावाची जमीन बळकावली, ग्रामस्थांचा मोर्चा

पाचगणी येथील दांडेघर या गावाची जमीन  खोटी कागदपत्रे तयार करून ताब्यात घेतली आहे. दमदाटी करून ही जमीन बळकावली असलीचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे .या घडलेल्या प्रकारचा निषेध करण्यासाठी दांडेघर ग्रामस्थांनी आज पाचगणीमध्ये निषेध मोर्चा काढला होता.

Updated: Jul 22, 2017, 05:38 PM IST
 title=

सातारा : पाचगणी येथील दांडेघर या गावाची जमीन  खोटी कागदपत्रे तयार करून ताब्यात घेतली आहे. दमदाटी करून ही जमीन बळकावली असलीचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे .या घडलेल्या प्रकारचा निषेध करण्यासाठी दांडेघर ग्रामस्थांनी आज पाचगणीमध्ये निषेध मोर्चा काढला होता.

पाचगणी घाटातील थापा म्हणून हा हिलस्टेशनचा  प्रसिद्ध असा हॅरिसन पॉईंट आहे. हे ठिकाण गाव दांडेघर गावचे मालकीचे गायरान मिळकत असताना सुहास वाकडे या व्यक्तीने खोटे फेरफार करून ही जमीन बळकावली असल्याचा आणि ही जागा अशोक गायकवाड यांना भाडे पट्ट्यावर दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

त्या पॉईंट वर सध्या गायकवाड यांच्या कडून प्रत्येक वाहनाकडुन कर घेतला जातो आहे आणि ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल करुन धमकावण्याचा उदयोग सुरु असून या विरोधात  ग्रामस्थांनी आज पाचगणी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढला.यावेळी त्यांच्या मागण्यांचे निवेदन ही देण्यात आले.