धुळ्यात 9.4 अंश से. तापमानाची नोंद झालीय तर निफाडमध्ये पारा 9.6 अंश से. इतका खाली घसरलाय. मनमाडमध्येही पारा 13.6 अंशांवर आलाय.
महाबळेश्वरमध्ये 9.2 अंश से. तापमान नोंदवण्यात आलंय. साताऱ्यात 12.3 अंश से. तापमानाची नोंद झालीय.
तिकडे विदर्भातही थंडीचा कडाका चांगलाच जाणवू लागलाय. नागपुरातील पाऱ्याची घसरण कमालीची झालीय. अमरावतीत 13.3 अंश से. तापमानाची नोंद झालीय.
गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून शेकोटी आणि त्याभोवताली गप्पांचे फड रंगलेले शहरातील विविध भागात दिसताहेत.
रात्रीच नव्हे तर दिवसाही गरम कपड्यांची गरज भासू लागलीय. थंडीची लाट अजून जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय.