Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 31 मार्चपर्यंत या गाडीच्या फेऱ्या रद्द

Konkan Railway Travel : कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या! कारण रत्नागिरी-मडगाव एक्स्प्रेस तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आली आहे.  

Updated: Dec 11, 2022, 12:49 PM IST
Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 31 मार्चपर्यंत या गाडीच्या फेऱ्या रद्द  title=
Ratnagiri-Madgaon-Ratnagiri-Daily-Express

Konkan Railway Travel : कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या! कारण रत्नागिरी-मडगाव एक्स्प्रेस तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आली आहे. (Temporary cancellation of Ratnagiri Madgaon Ratnagiri Daily Express) रत्नागिरी ते मडगाव जंक्शनदरम्यान कोकण रेल्वेकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरी ते मडगाव एक्स्प्रेसच्या दोन्ही बाजुंच्या फे-या 31 मार्च 2023 पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या फेऱ्या आधी 31 डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. पण दुरुस्तीचं काम लांबणार असल्याने 31 मार्चपर्यंत फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोकण रेल्वेकडून दुरुस्तीचे काम हाती 

10101 / 10102 रत्नागिरी - मडगाव जंक्शन - रत्नागिरी डेली एक्स्प्रेसच्या तात्पुरत्या रद्द करण्यात आली होती. यात आता कालावधीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे.  रेल्वे क्रमांक 10101 आणि 10102 रत्नागिरी - मडगाव जं. - रत्नागिरी डेली एक्स्प्रेस 31 अर्थात शुक्रवारपर्यंत तात्पुरती रद्द करण्यात आली होती. मात्र आता रत्नागिरी आणि मडगाव विभागादरम्यान सुरु असलेल्या सुरक्षा देखभाल कामामुळे ही गाडी रद्द करण्यात आली होती.

रत्नागिरी ते मडगाव ह्या दरम्यान चालविण्यात येणाऱ्या 10101 रत्नागिरी-मडगाव आणि 10102 मडगाव-रत्नागिरी या दोन गाड्या तात्पुरत्या रद्द केल्याचे अनेकांची गैरसोय होत आहे. रात्री येणारी रत्नागिरी - दादर पॅसेंजर रत्नागिरीपर्यंत धावत आहे. त्यामुळे यातून अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोक प्रवास करत करत असत. त्यामुळे त्यांना पुढे जाण्यास अडचणी येणार आहे.  कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.

ह्या आधी या गाड्या दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यन्त रद्द असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता ती मुदत दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. रत्नागिरी ते मडगाव या स्थानकांदरम्यान रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने अभियांत्रिकी कारणासाठी ही गाडी रद्द ठेवण्यात येणार आहे असे कोंकण रेल्वेने जाहीर केले आहे. दुपारी येथून सुटणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर हीच गाडी पुढे  रत्नागिरी येथे तासभराच्या थांब्यांने रत्नागिरी मडगाव म्हणून चालविण्यात येत होती. आता ती रद्द करण्यात आली आहे.