Maharashtra Budget 2023 : शिदे फडणवीस सरकारचे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन विविध मुद्द्यांमुळे चांगलेच गाजत आहे. विरोधक आक्रमक झाले आहेत. तर, सत्ताधारी देखील तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर देत आहेत. अधिवेशनाच्या या गदारोळात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत भास्कर जाधव यांनी विधान भवनाच्या पाय-यांवर डोकं टेकवल्याचे दिसत आहे.
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी उद्विग्न होत तीन दिवस आधीच अधिवेशनाचा निरोप घेतला. जाता जात विधान भवनाच्या पाय-यांवर डोकं ठेवून त्यांनी नमस्कार केला. सभागृहात बोलू दिलं जात नसल्यानं अधिवेशनात हजेरी लावून काही उपयोग नसल्याची नाराजी त्यांनी बोलून दाखवली आहे. मात्र, अधिवेशानतून बाहरे पडताना भास्कर जाधव हे विधान भवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
अवकाळी पावसामुळे विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. पावासामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबत लक्षवेधी मांडली असता बोलू दिले जात नाही. यामुळे अधिवेशन संपेपर्यंत मी पुन्हा सभागृहात येणार नाही. मला जाणीवपूर्वक सभागृहात बोलू दिले जात नाही. हे सभागृह घटनेने चालावे हे अपेक्षा असते. माझी एकही लक्षवेधी लागलेली नाही. अशी खंत भास्कर जाधव व्यक्त केली.
मुंबईचं टेक्सटाईल आयुक्तालय दिल्लीला हलवण्याचा केंद्र सरकरानं निर्णय घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला. महाराष्ट्र, मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न असेल तर तो हाणून पाडा असं जयंत पाटील यांनी विधानसभेत म्हटलंय. तर टेक्स्टटाईल्स आयुक्तालय दिल्लीत हलवण्याचा निर्णय झालेला नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
अवकाळी पावसामुळे उध्वस्त झालेल्या शेतक-याला सरकारने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधी पक्षाने विधानसभेत केली. संपामुळे कर्मचारी पंचनामे करण्यास येत नव्हते. हा मुद्दा देखील अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. वादग्रस्त वक्तव्यांनी सत्ताधारी आमदार वाद निर्माण करत आहेत असं अजित पवार म्हणाले. सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षाने सभात्याग केला होता.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पावसाळी अधिवेशनाचा फील आला. अचानक आलेल्या पावसामुळे आमदार, सचिवांची चांगलीच पळापळ झाली. आमदारांना सभागृहात पोहोचताना छत्रीचा आधार घ्यावा लागला.