ठाणे : शिवसेना आमदार आणि प्रवक्ते प्रताप सरनाईक (Pratap Sirnaik) यांच्या ठाण्यातील घरी ईडीचे (ED) पथक दाखल झालंय. पूर्वश ,विहंग सरनाईक यांच्या घरी देखील ईडी अधिकारी पोहोचले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सरनाईक कुटुंबांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरु आहे.
ईडीने हा छापा नेमका कोणत्या कारणासाठी टाकला ? हे थोड्यावेळाने स्पष्ट होईल. इन्फोर्समेंट डिरेक्टरची ही टीम सरनाईकांनी केलेल्या व्यवहारामध्ये आर्थिक घोटाळा आहे का ? याची चौकशी करत आहेत. सरनाईक हे सरनाईक हे स्वत: बांधकाम व्यावसायिक आहेत. ते शिवसेनेचे प्रवक्ता असून गेले ते शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने भाजप ईडी सारख्या संस्थांचा वापर करुन भाजपविरोधात बोलणाऱ्या नेत्यांचे तोंड गप्प करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय.
याआधी ईडीकडून सरनाईकांना कोणत्या प्रकारचे समन्स बजावण्यात आल्याची बातमी अद्याप समोर आली नाही.
ईडी होमवर्कपेक्षा जाणार नाहीत. शिवसेनेचे नेते पैसे बोगस कंपन्यांमध्ये गुंतवतात हे मला माहीतेय. त्यांनी भ्रष्टाचाराचा बेनामी पैसा लाटला असेल तर कारवाई व्हायला हवी अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्यांनी 'झी २४ तास'ला दिलीय.