कळवा येथे चोरट्यांकडून गोळीबार, एकाचा मृत्यू

एका मेडिकल दुकानात चोरट्यांनी गोळीबार केला. त्यात एकाचा मृत्यू झाला.

Updated: Dec 28, 2019, 06:51 PM IST
कळवा येथे चोरट्यांकडून गोळीबार, एकाचा मृत्यू title=

ठाणे : कळवा भागातील शिवाजीनगर परिसरात एका मेडिकल दुकानात चोरट्यांनी गोळीबार केला. पहाटेच्या सुमारास चोरटे दुकानात शिरले. मात्र त्याचवेळी दुकानात झोपलेल्या तरुणाला जाग आली आणि त्यांने प्रतिकार केला. चोरट्यांनी थेट त्याच्यावरच गोळीबार केल्याने त्याचा मृत्यू झाला. ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. मेडिकल स्टोअरमध्ये चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या चोरट्याने रिव्हॉलरने गोळी झाडून २६ वर्षीय कर्मचाऱ्याची हत्या केल्याची घटना शनिवारला पहाटे चारच्या सुमारास घडली. हा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून चोरटा दुकानाचे शटर उचकटून आता शिरला होता. या घटनेमुळे मेडिकल दुकान चालकांनी संताप व्यक्त केला असून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

कळवा पूर्व शिवाजीनगर येथे रामसिंग राजपुरोहीत यांचे 'वीर युवराज मेडिकल'नावाचे मेडिकल स्टोअर आहे. या दुकानात रामसिंग याचे नातेवाईक प्रेमनाथ किशोरसिंग राजपुरोहीत हे कामगार काम करतात. रात्री काम संपल्यावर दुकान बंद करून प्रेमनाथ दुकानातच झोपत असत. शनिवारी पहाटे ३ वाजून ५२ मिनिटांच्या सुमारास शटर उचकटून चोरी करण्याच्या उद्देशाने दुकानात शिरलेल्या चोरट्याची चाहूल प्रेमनाथ यांना लागली. तेव्हा, त्यांनी चोरट्याला प्रतिकार केला असता चोरट्याने आपल्याकडील रिव्हॉलरने गोळी झाडून प्रेमनाथ याची हत्या केली. ही हत्या चोरीच्या हेतूने झाली असल्याचा प्राथमिक अंदाज कळवा पोलिसांनी व्यक्त केला असून सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या माध्यमातून हल्लेखोर चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत.  

या घटनेमुळे मेडिकल दुकान चालकांनी संताप व्यक्त केला असून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.लवकरात लवकर आरोपी पकडला गेला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर या घटनेमध्ये एक वेगळा प्रकार समोर आलाय. या मेडिकलच्या दुकानाच्या बाजूला सुरज ज्वेलर्स आहे आणि ज्वेलर्सचे दुकान न फोडता चोरटयांनी मेडिकलचे दुकानात का चोरी करण्याचे ठरवले याचीच चर्चा सुरु आहे.