Mumbai News: सध्या सगळीकडेच गोवरच्या ( Measles Disease ) आजारानं डोकं वर काढलं आहे त्यामुळे सगळीकडेच भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे सध्या लहान मुलांची विशेष काळजी करणं गरजेचं झालं आहे. परंतु सध्या या प्रकारानं राज्यभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एक धक्कादायक प्रकार मुंब्रामध्ये ( Mumbai News ) घडला आहे. ठाण्यातील मुंब्रा येथे कुलूप बंद घरात गोवर बाधित 4 बालकांना बंद करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार (shoking news) समोर आला आहे. या बालकांवर पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले त्वरित उपचार सुरू केले आहेत. (Thane Municipal Corporation health workers immediately treated patients with measles who were confined in a locked house)
गोवरच्या आजाराने डोके वर काढले असून बालकांना लसीकरण करून घेण्यास काही भागात विरोध केला जात असताना कौसा येथील पालिकेच्या आरोग्य केंद्राच्या हद्दीत एका घरात बालकांना लपवून ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरातील पालकांनी घरातच तब्बल 4 बालकांना ठेवून बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. ही बाब पालिकेच्या (municipality) आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना लक्षात आल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गोवर बाधित मुलांवर त्वरित उपचार केले. दरम्यान गोवर आजार संदर्भात लोकांची मानसिकता अजून बदललेली नसल्याचे या निमित्ताने उघड झाले असून पालिका प्रशासनाने शोधमोहीम आणखीन कठोर सुरु करून लसीकरण (vaccination) वाढवण्यासाठी पाऊले उचलले आहेत. ठाणे पालिका हद्दीत आतापर्यंत 51 रुग्ण उपचार घेत असून पालिकेच्या पार्किंग प्लाझा येथे 36 तर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 14 रुग उपचार घेत आहेतण् गेल्या 10 दिवसात 341 रुग्ण संसर्ग बाधित आढळले आहेत.
राज्यात गोवरने 12 जिल्ह्यांमध्ये हातपाय पसरले आहेत. त्यामुळे गोवरचा हा प्रकोप का वाढतोय याची आता कारणं शोधली जाणार आहेत. महापालिका आणि जागतिक आरोग्य संघटनेचे (world health orgnisation) सल्लागार म्हणून काम करणा-या डॉक्टर्सनी या सूचना दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान केंद्रीय पथकाने मुंबईत गोवरचा हॉटस्पॉट (hotspot) असलेल्या गोवंडीत भेट दिली. गोवर आजारासंदर्भात आढावा घेत पथकाने महापालिका अधिका-यांसोबत चर्चा केली. विषाणूंमध्ये काही जनुकीय बदल होत आहेत का याची पाहणी जीनोम सिक्वेंसिंगद्वारे करता येईल का यावरही चर्चा झाल्याचं समजतंय.
संभाजीनगरातच गोवरच्या तपासणीची सोय उपलब्ध करून देण्यात आलीय. घाटी रूग्णालयाच्या लॅबमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिलीय. याआधी सँपल्स मुंबई किंवा पुण्याला हाफकीनमध्ये तपासणीसाठी पाठवले जायचे. त्यामुळे रिपोर्ट यायला आठ ते दहा दिवसांचा वेळ लागायचा. मात्र आता सहा ते आठ तासांतच रिपोर्ट (report) येणार आहे.