मोठी बातमी! केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, पोलीस कळंबोलीतल्या घरी पोहचले

केतकी चितळेविरोधात राज्यात 15 ठिकाणी गुन्हे दाखल  

Updated: May 16, 2022, 04:09 PM IST
मोठी बातमी! केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, पोलीस कळंबोलीतल्या घरी पोहचले title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळेला (Ketki Chitale) चांगलंच महागात पडलं आहे. केतकीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 

त्यानंतर आज ठाणे पोलीस केतकी चितळे हिला घेऊन तिच्या कळंबोली इथल्या घरी पोहचले आहेत. केतकीच्या घरातून लॅपटॉप आणि इतर कागदपत्र घेण्यासाठी पोलीस तिच्या घरी दाखल झाले आहेत. लॅपटॉपमध्ये आणखी काही आक्षेपार्ह माहिती मिळतेय का याची तपासणी पोलीस करतील. त्यानंतर तीला पुन्हा ठाणे पोलीस स्टेशनला आणलं जाईल. केतकी अटक करताना पोलिसांनी आधीच तिचा मोबाईल जप्त केला होता. 

दरम्यान, केतकी चितळेविरोधात 15 ठिकाणी गुन्हा दाखल झालाय. उस्मानाबाद, पारनेरनंतर आज नवी मुंबईतही केतकीविरोधात गुन्हा दाखल झालाय. शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट केल्याने केतकीविरोधात गुन्हे दाखल होत आहेत. राज्यातील गोरेगाव, पवई, भोईवाडा, कळवा, नेरूळ, पुणे, पिंपरी चिंचवड देहूरोड, नाशिक, धुळे, अकोला, अमरावती, जळगाव, सातारा, उस्मानाबाद, पारनेर पोलीस ठाण्यात केतकी चितळे विरोधात एफआयआर नोंदवलेत. दरम्यान केतकीला समर्थन देणा-या किरण इनामदारवरही पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अभिनेत्री मानसी नाईकची टीका
अभिनेत्री मानसी नाईकने केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टवर नाराजी व्यक्त केलीय. कोणीही अशा पोस्ट करणं चुकीचं असून जेव्हा हे वाचलं मला वाईट वाटल्याची प्रतिक्रिया मानसीने व्यक्त केलीय. शरद पवार हे खूप मोठं व्यक्तीमत्व आहे त्यांच्या बद्दल अस बोलणं योग्य नसल्याचंही मानसीने म्हटलंय. अश्या पोस्ट करणाऱ्यांवर कठोरतील कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही तिने केलीय