भावेश भिंडेने रेल्वे पोलीस आयुक्ताच्या पत्नीच्या अकाऊंटमध्ये टाकले 46 लाख; सोमय्यांचा खळबळजनक आरोप

Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी इगो मिडियाचे भावेश भिंडे याने रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या पत्नीच्या अकाऊंटमध्ये 46 लाख रुपये टाकले. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 22, 2024, 08:33 PM IST
भावेश भिंडेने रेल्वे पोलीस आयुक्ताच्या पत्नीच्या अकाऊंटमध्ये  टाकले 46 लाख; सोमय्यांचा खळबळजनक आरोप title=
Ghatkopar hoarding case Bhavesh Bhinde

Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर होर्डींग प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या दुर्घटनेतील आरोपी इगो मिडियाचे भावेश भिंडे याने रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या पत्नीच्या अकाऊंटमध्ये 46 लाख रुपये टाकले. भाजप नेते किरीट सोमैयांनी हा खळबळजनक आरोप केला आहे.

रेल्वे पोलीस आणि महापालिकेला 5 लाखाची लाच दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. कैसर खालिद यांचे निलंबन करावे अशी मागणी कीरीट सोमैया यांनी केली आहे. 

काय घडली होती घटना?

जाहिरातीचे महाकाय होर्डिंह पेट्रोल पंपावर कोसळल्याने घाटकोपर हादरले होते. या घटनेत 16 जणांचा मृत्यू तर 78 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आरोपी भावेश भिंडेला पोलिसांनी अटक केली होती. घाटकोपरमध्ये उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकाला रेल्वे पोलिसांनी परवानगी दिली होती. मात्र मुंबई महापालिकेच्या 2008 च्या धोरणानुसार मुंबईत कोणत्याही जागेवर जाहिरात फलक उभारायचे असल्यास त्याकरीता मुंबई महापालिकेची परवानगी आवश्यक आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. तसेच जास्तीत जास्त 40 फूट रुंदी आणि उंचीचे जाहिरात फलक असावेत. अन्य प्राधिकरणांच्या हद्दीत फलक असले तरी त्याला महापालिकेची परवानगी बंधनकारक करण्यात आल्याची आठवण पालिकेने करुन दिली. 

घाटकोपर दुर्घटनेतील फलक अनधिकृत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. फलकावर जाहिरात शुल्कही महापालिकेकडे भरावे लागते. मात्र घाटकोपरच्या जाहिरात फलकाला महापालिकेची परवानगी नसल्याचे आढळून आले होते.