नांदेड : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचं वर्चस्व असलेल्या साखर कारखान्याने, शेतकऱ्यांचे १ कोटी ८० लाख रुपये बुडवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तक्रारीनंतर साखर आयुक्तांनी आदेश देऊन याबाबत तपासणी केली.
मराठवाड्यातला सर्वात चांगला कारखाना म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचं वर्चस्व असलेल्या भाऊराव चव्हाण कारखान्याची ओळख आहे.
२०१३-१४ च्या गाळप हंगामात भाऊराव चव्हाण कारखान्याकडे एफ आर पी च्या रकमेप्रमाणे ५ कोटी ११ लाख रुपये थकीत होते.
मार्च २०१६ पर्यंत थकबाकीत ही रक्कम दिसत होती. पण मे २०१६ मध्ये ही रक्कम कागदावरुन गायब झाली. शेतकऱ्यांना पैसेच न मिळाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महिती अधिकारात ही बाब उघड केली.
भाऊराव चव्हाण कारखान्याच्या युनिट १ कडे १ कोटी २१ लाख आणि युनिट दोनकडे ६० लाख रुपये थकबाकी असल्याचं चौकशीत स्पष्ट झालं.