८ दिवसापासून बेपत्ता कोरोनाबाधित महिलेचा शौचालयात सापडला मृतदेह

धक्कादायक घटना आली समोर...

Updated: Jun 11, 2020, 12:02 PM IST
८ दिवसापासून बेपत्ता कोरोनाबाधित महिलेचा शौचालयात सापडला मृतदेह title=

जळगाव : जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमधून गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका 82 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह बुधवारी शौचालयात सापडला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही गोष्ट तेव्हा समोर आली जेव्हा काही लोकांनी रुग्णालयाच्या बाथरुममधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. गेल्या 8 दिवसांपासून मृतदेह शौचालयात पडला होता.

जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनीही वृद्ध महिलेच्या मृत्यूची पुष्टी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिव्हिल हॉस्पिटलच्या शौचालयात त्याचा मृतदेह पडलेला होता हे खरे आहे. दरवाजा आतून बंद होता.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ही महिला जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील रहिवाशी असून तिला रेल्वेकडून सुरू असलेल्या स्थानिक रुग्णालयात सुरुवातीला दाखल केले गेले होते. १ जून रोजी महिलेला जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आणि दुसर्‍या दिवशी महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.

जेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी महिलेच्या प्रकृतीची काळजी विचारण्यासाठी फोन केला. तेव्हा महिला जागेवर नसल्याचं समोर आलं. त्यानंतर कुटुंबीयांनी जळगावच्या पेठ पोलीस ठाण्याला तक्रार दाखल केली. परंतु त्यामुळे फारशी मदत झाली नाही.

रुग्णालयातील सीसीटीव्ही बंद असल्याने महिला कुठे गेली हे कळू शकले नाही. पण काही दिवसानंतर जेव्हा रुग्णालयच्या शौचालयामधून दुर्गंदी येऊ लागली तेव्हा महिलाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.