चंद्रपूर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक लाखांची लाच घेताना अटक

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडीने खळबळ उडाली आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. पोटे यांना एसीबीने 1 लाख रु. लाच घेताना बँकेतच अटक केली. 

Updated: Oct 10, 2018, 10:26 PM IST
चंद्रपूर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक लाखांची लाच घेताना अटक

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडीने खळबळ उडाली आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. पोटे यांना एसीबीने 1 लाख रु. लाच घेताना बँकेतच अटक केली. 

एका खातेधारकाने आपली गहाण ठेवलेली जमीन विक्री करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. मात्र ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँकेचे सीईओ पोटे यांनी 1 लाख रु. ची मागणी केली. या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. 

एसीबीने बँकेच्या मुख्य कार्यालयात सापळा रचला. एसीबीने पोटे यांना अटक केली असून यात अन्य कुणाचा वाटा होता का याचा तपास पोलीस करत आहेत.