राज्यात वाढत्या रुग्णसंख्येसोबत ऑक्सिजनची मागणी 'इतक्या' पटीने वाढली

 राज्यातील ऑक्सिजनची मागणी सात पटीने वाढलीय

Updated: Apr 21, 2021, 11:31 AM IST
राज्यात वाढत्या रुग्णसंख्येसोबत ऑक्सिजनची मागणी 'इतक्या' पटीने वाढली title=

मुंबई : राज्यात ऑक्सिजनची मागणी सातपट वाढली आहे. राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता 1287 टन आहे. पुण्याची मागणी वाढल्याने मराठवाड्यातील पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. पुण्यातून नगर, लातूर, बीड, अकोला, जालना, यवतमाळ याठिकाणी पुरवठा केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ऑक्सिजनची मागणी सात पटीने वाढलीय. दिवसभरात साधारणत: 59 हजार नवे रुग्ण आढळत आहेत. अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवत असल्यामुळे ऑक्सिजनच्या मागणीत कमालीची वाढ झालीय. 

राज्यातील 80 टक्के ऑक्सिजन उद्योगांसाठी वापरला जातो. यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर या जिल्ह्यांची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता 417 टन आहे. 

मात्र वैद्यकीय मागणी पाचशे टनांच्या पुढे गेली आहे. तर पुण्यातील ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. त्यामुळे पुण्यातून मराठवाड्यात होणार ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो.

राज्यांना ऑक्सिजन 

केंद्राकडून राज्यांना 6177 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी यासंदर्भात माहिती दिलीय. केंद्राकडून महाराष्ट्राला 1500 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवण्यात येणार आहे. असे असले तरी 20 एप्रिलनंतर हा ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. दरम्यान कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे राज्य सरकारांना वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी नियंत्रणात ठेवावी लागेल. पुरवठ्याबरोबरच मागणीही नियंत्रणात ठेवण्याची गरज असल्याचे गोयल म्हणाले

'600 लिटर ऑक्सिजन शिल्लक' 

राज्यासह देशभरात कोरोना रुग्णसंख्येत (Corona Patient) वाढ होत असून ऑक्सिजनचा तुटवडा (Oxigen Supply) मोठ्या प्रमाणात जाणवतोय. दरम्यान कोल्हापुरातून एका धक्कादायक बातमी समोर येतेय. कोल्हापुरातील छत्रपती प्रमीलाराजे रुग्णालयात (CPR) रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाय. रुग्णालयात 600 लिटर म्हणजे 15 तास पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. अन्य शहरातून आज रात्रीपर्यंत ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होईल असं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.