Mumbai Crime News: मुंबईच्या गोवंडी परिसराचत सैराटसारखीच घटना घडली. प्रेमविवाह केल्यामुळे वडिलांनी मुलीसह जावयाची निर्घृण हत्या केली. कुटुंबीयांच्याविरोधात जाऊन आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागात वडिलांनी मुलीसह जावयाला संपवले आहे. या घटनेमुळ खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह तिघांना अटक केली आहे.
वडिलांनी माहेरी आलेल्या गुलनाज खान या मुलीची दगडाने ठेचून हत्या केली. तर जावई करण रमेश चंद्रची चाकूने वार करून हत्या केली. हा धक्कादायक प्रकार मुंबईतील गोवंडी परिसरात घडलाय. या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून 10 पथकं तयार करण्यात आली होती. यामध्ये पोलिसांनी वडील गोरा खान, भाऊ सलमान खानसह त्याचा 2 अल्पवयीन मित्राला अटक करण्यात आली आहे. यामध्ये आणखी कोणी सहभागी आहेत क ? याविषयी पोलिसांकडून तपास केला जात आहे.
पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील करंजविहिरे इथे हॉटेलमध्ये झालेली दुहेरी हत्याकांड झाले होते. ही ऑनर किलिंगची घटना नसल्याचं पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी म्हटल होते. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचं त्यांनी सांगितलं. मृत प्रियकर बाळू गावडे हा करंजविहीरे गावातील बाळू मरगज यांच्या वीटभट्टी वरती कामाला होता. याच काळात बाळूचे वीटभट्टी मालकाच्या मुलीशी प्रेमसंबंध जुळले. बाळूने मालकाच्या 21 वर्षीय मुलीला 15 जुलै रोजी पळवून नेल्यानंतर ही घटना घडली. बाळूला मदत केली म्हणून राहुल गावडेचीही हत्या केली. याप्रकरणी नऊ जणांना अटक केली होती.
आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून दाम्पत्याला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार नगरच्या निघोजमध्ये घडला होता. यात रुख्मिणी रणसिंग यांचा मृत्यू झालाय. तर मंगेश रणसिंग हे गंभीररित्या भाजलेत. दोघांनीही घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आंतरजातीय विवाह केला होता.
तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यात 'सैराट'चा क्लायमॅक्स घडला होता. प्रेमविवाह केलेल्या एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आपल्या गरोदर पत्नीला दवाखान्यातून बाहेर नेताना, तिच्या समोरच पाठीमागून आलेल्या एका व्यक्तीनं प्रणय कुमार याचा कोयत्यानं गळा चिरला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. प्रणयचं सहा महिन्यांपूर्वी अमृता हिच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. अमृता ही एका बड्या बिल्डरची मुलगी असल्याची माहिती समोर आलीये. या दोघांचा विवाह झाला तेव्हाही बराच तणाव असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. गरोदर असलेल्या अमृताला घेऊन प्रणय ज्योती नर्सिंग होममधून बाहेर आला. त्यावेळी त्यांच्यासोबत नातलग असलेली एक महिलाही होती. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या हल्लेखोरानं त्याच्या गळ्यावर कोयत्याचे दोन वार केले आणि तो पळून गेला.
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.