close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंबई - गोवा महामार्गावर मोरी खचल्याने वाहतुकीवर परिणाम

मान्सूनपूर्व पावसात मुंबई - गोवा महामार्गाची दैना उडाली आहे.  

Updated: Jun 20, 2019, 07:23 AM IST
मुंबई - गोवा महामार्गावर मोरी खचल्याने वाहतुकीवर परिणाम

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसात मुंबई - गोवा महामार्गाची दैना उडाली आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील पालीनजिकच्या आशू धाबा येथे नव्याने केलेली मोरी खचल्याने महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच एमएपी या ठेकेदार कंपनीची यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आणि खचलेल्या मोरीच्या ठिकाणी खडी टाकून महमार्ग सुरू करण्यात आला. दरम्यान, काल दुपारपासून चांगला पाऊस झाला. या पावसाने मोरी खचली.

मात्र, मान्सून पूर्व पावसातच मुंबई गोवा महामार्ग दोन वेळा खचलेला पाहायला मिळाला आधी लांजा वाकेड येथे महमार्गावरच रस्ता वाहून गेल्याची घटना घडली होती व तीन तासांनी महामार्ग सुरू झाला होता मात्र महामार्ग सुरू झाल्यापासून तासाभरात पुन्हा महामार्ग रत्नागिरीच्या पाली जवळ ठप्प झाला. या ठिकाणी नव्याने टाकलेली मोरीच खलचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. अखेर स्थानिकांच्या शर्तीच्या प्रयत्नाने महामार्गावरील वाहतुक संतगतीने सुरू करण्यात आली आहे.