पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव सन्मान पुरस्कार जाहीर; साताऱ्यात होणार भव्य सत्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा मानाचा शिव सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. साताऱ्यात हा सत्कार सोहळा पार पडणार आहे. 

Updated: Jan 31, 2024, 05:11 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव सन्मान पुरस्कार जाहीर; साताऱ्यात होणार भव्य सत्कार title=

Prime Minister Narendra Modi :  श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा मानाचा शिव सन्मान पुरस्काराची घोषणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या 19 फेब्रुवारीला सैनिक स्कूल ग्राउंड सातारा येथे भव्य दिव्य असा हा सोहळा पार पडणार आहे. श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज हे पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक आहेत. 

फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 वेळा महाराष्ट्र दौ-यावर 

फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 वेळा महाराष्ट्र दौ-यावर येण्याची शक्यता आहे. 5, 11 आणि 19 फेब्रुवारीला मोदी महाराष्ट्रात येणार असल्याचं बोललं जातं आहे. 5 फेब्रुवारीला जळगाव, 11 फेब्रुवारीला यवतमाळ आणि 19 फेब्रुवारीला पुणे, नागपूर असा दौरा करण्याची शक्यत आहे. नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये महिला बचत गटाच्या मेळाव्याला संबोधित करतील तर नागपुरात भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करतील अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षाच्या वेगवेगळ्या आघाडीच्या खास सभा घेण्याचं ठरवल आहे. त्या सभेला मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौ-यावरून संजय राऊतांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौ-यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे. महायुती लोकसभेच्या चार जागा सुद्धा जिंकू शकत नाही त्यामुळे मोदींना वारंवार महाराष्ट्रात प्रचारासाठी यावं लागतंय अशी टीका राऊतांनी केली. तर, राऊतांना काळ्या मांजराप्रमाणे आडवं येण्याची सवय असल्याची टोला नितेश राणेंनी लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं नवी रणनीती तयार केली आहे.  मुंबईत भाजप 5 हजार नमो वॉरियर्स तयार करणारेत. भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो वॉरियर्स म्हणून त्यांची निवड होईल.  पहिल्या टप्प्यात 100 महाविद्यालयांतल्या 18 ते 21 वयोगटातील विद्यार्थ्यांना संधी मिळणारेय. प्रत्येक महाविद्यालयातल्या 50 तरुण-तरुणींची निवड होणारेय. युवा वॉरियर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असणारेय. नमो वॉरियर्सला कामासाठी भाजप मानधनही देण्यात येणार आहे 

लोकसभा निवडणुकीआधी पुणे भाजपमध्ये उमेदवारीसाठी चुरस 

लोकसभा निवडणुकीआधी पुणे भाजपमध्ये उमेदवारीसाठी चुरस पहायला मिळतेय. माजी आमदार जगदीश मुळीक यांनी व्हिजन डॉक्युमेंटच्या नावाखाली थेट निवडणुकीचा जाहीरनामाच तयार करायला घेतलाय. याच अनुषंगाने पुणे शहराचा विकास आणि प्रश्नांचा वेध घेणारी व्हिजन पुणे शिखर परिषद जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. आमदार माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी या परिषदेत आपापली मतं मांडली. व्हिजन पुणे डॉक्युमेंट च्या निमित्ताने जगदीश मुळीक यांनी लोकसभेच्या उमेदवारीवर दावा केला असला तरी शहर भाजपनं यासंदर्भात सावध भूमिका घेतलीय.