अरुणाचल प्रदेश सीमेवर महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

 चिखलदरा तालुक्यातील सुरणी येथील मुन्ना पुनाजी शेलूकर भारतीय सैन्यात असलेले शिपाई अरुणाचल प्रदेश सीमेवर शहीद झालेत. 

Updated: Jan 5, 2019, 07:41 PM IST
अरुणाचल प्रदेश सीमेवर महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण title=

अमरावती : जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील सुरणी येथील मुन्ना पुनाजी शेलूकर भारतीय सैन्यात असलेले शिपाई अरुणाचल प्रदेश सीमेवर शहीद झालेत. मुन्ना पुनाजी शेलूकर बिहारच्या 47 बटालियनमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. 3 जानेवारी रोजी शत्रूशी लढताना झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले आहे.

शहीद मुन्ना शंकर यांचे पार्थिव आज सायंकाळपर्यंत अमरावती जिल्ह्यातील या त्यांच्या मूळ गावी पोहोचणार आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.