रेबीज झालेल्या म्हशीचं दूध प्यायल्याच्या भीतीने गावकऱ्यांची रुग्णालयात गर्दी

 रेबीज झाल्याच्या भीतीने गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने डॉक्टरांकडे धाव घेतल्याची खळबळजनक घटना 

Updated: Jan 28, 2020, 07:34 PM IST
रेबीज झालेल्या म्हशीचं दूध प्यायल्याच्या भीतीने गावकऱ्यांची रुग्णालयात गर्दी  title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : रेबीज झाल्याच्या भीतीने गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने डॉक्टरांकडे धाव घेतल्याची खळबळजनक घटना कोल्हापूरमधील शियेमध्ये घडली आहे. अचानक समोर आलेल्या गावकऱ्यांमुळे डॉक्टरही भांबावले आहेत. 

एका गावकऱ्या म्हशीला रेबीज झाला होता. त्यातच पिसाळून तिचा मृत्यू झाला. म्हशीला रेबीज झाल्यानंतर मालकाने एक ढोस दिला होता. या म्हशीचं दूध जवळच्या दूध डेअरीमध्ये जातं असे. इथे इतर दुधामध्ये हे दूध एकत्र झाल्याचा संशय गावकऱ्यांना आला. त्यामुळे म्हशीचं दूध ज्या दूध डेअरीमध्ये जात होत तिथून दूध विकत घेणारे गावकरी आता धास्तावले आहेत. 

भीतपोटी सर्व गावकर्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. म्हशीला रेबीज झाल्याने आपल्यालाही रेबीज होईल अशी भीती ते डॉक्टरांकडे व्यक्त करत आहेत. अचानक मोठ्या संख्येने आलेल्या रुग्णांमुळे डॉक्टरांचा देखील गोंधळ उडाला आहे.