हापूस बाजारात दाखल, डझनला तीन हजार रुपये

हापूस आंबा यंदा जानेवारी अखेरीस बाजारपेठेत दाखल झाला आहे. खवय्यांची प्रतिक्षा संपली असली तरी त्यांच्या खिशाला थोडा भार पडणार आहे. 

Updated: Jan 28, 2020, 07:07 PM IST
हापूस बाजारात दाखल, डझनला तीन हजार रुपये title=
संग्रहित छाया

रत्नागिरी : अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे यंदाचा हापूस बाजारात उशिरा दाखल झाला आहे. गतवर्षी हापूस आंबा नोव्हेंबर अखेरीस बाजारात दाखल झाला होता. यावर्षी हापूसला जानेवारी अखेर यावी लागली. मात्र, हापूस बाजारात आला तरी तो महाग आहे. त्यामुळे खाणाऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

हापूसच्या खवय्यांसाठी काहीसा उशीरा का होईना रत्नागिरीतल्या बाजारात हापूस दाखल झाला आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे यंदा कोकणजा राजा बाजारात यायला उशीर झाला. रत्नागिरीत सध्या हापूसचे दर हे २८०० ते ३००० रूपये डझनला आहे.

गेल्यावर्षी नोहेंबर अखेरीस स्थानिक बाजारपेठेत दाखल झालेला आंबा यंदा जानेवारी अखेरीस बाजारपेठेत दाखल झाला आहे. आंब्याची अतुरतेने वाट पाहणाऱ्या खवय्यांची प्रतिक्षा संपली असली तरी त्यांच्या खिशाला थोडा भार पडणार आहे. पुढील महिनाभर हा दर असाच कायम असण्याची शक्यता आहे. त्यामुळे चढ्या दरामुळे हापूसची गोडी खाणाऱ्यांसाठी कमी असणार हे नक्की. दरम्यान, काजुचे ओल्या काजूचे दर देखील चढेच असून किलोला १६०० रूपये मोजावे लागत आहेत.