Nashik Rain : नाशिकमध्ये गंगापूर धरणातून 6 हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे, गोदावरी नदीला पूर आलाय. तर या पुराच्या पाण्यामुळे, रामकुंडातील मंदिरे पुराच्या पाण्याखाली गेली आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीएवढं पुराचं पाणी आल्याने, प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय..तर गोदाकाट परिसरातील दुकाने देखील प्रशासनाने हटविण्यास सुरुवात केली आहे.
नाशिकच्या रामकुंड परिसरातील पुरात योगेश पवार नावाचा 29 वर्षीय तरुण वाहून गेला. रामकुंड परिसरात तो कालसर्प योग पूजेसाठी आला होता. महावितरणमध्ये अभियंता म्हणून योगेश पवार जळगावच्या भुसावळमध्ये कार्यरत होता. गोदावरी नदीत पूजन करताना पाय घसरून नदीत पडून तो वाहून गेला. प्रशासनाकडून त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान गोदावरी नदीची पाणी पातळी वाढल्याने रामकुंड परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर रामकुंड परिसरातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं.
नाशिकच्या पुराच्या पाण्यात रामतीर्थ सेवा समितीकडून गोदावरीची आरती करण्यात आलीये..गोदाघाटावर 29 वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतरही समितीकडून आरती करण्याचा अट्टाहास करण्यात आला. जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या राहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलंय. पुराच्या पाण्यात न उतरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.गंगापूर धरण्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे..
आमदार सरोज अहिरे यांचा धोकादायक प्रवासाचा व्हिडिओ समोर आला आहे. दशक्रिया विधीला उपस्थिती लावण्यासाठी सरोज अहिरे यांनी चक्क पुराचं पाणी पार केलं. नदीवरील पुलावरुन ट्रॅक्टरवर उभं राहून त्यांनी हा धोकादायक प्रवास केला. अहिरे नाशिकमधील देवळालीच्या आमदार आहेत.
नाशिकच्या सुरगाणा, कळवण, दिंडोरीमध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग सुरुयं. यामुळे पुनेगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.. मात्र यामुळे सुरगाणामधील नद्यांना पूर आला असून, धरणातून विसर्ग सुरु असल्याने, नद्यांनी रौद्ररूप धारण केल्याचं पाहयला मिळतयं.