आमदार रोहित पवार यांची अशी ही बाजू, राजकारणात नाही तर यातही तरबेज

आमदार असले म्हणून काय झालं? कधी कधी या आमदारांची दुसरी बाजूही अनपेक्षितपणे समोर येते.

Updated: Mar 31, 2022, 04:47 PM IST
आमदार रोहित पवार यांची अशी ही बाजू, राजकारणात नाही तर यातही तरबेज  title=

पुणे : भाजपचे मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून विधानसभेत प्रवेश करणारे तरुण आमदार म्हणजेच रोहित पवार. 

पवार घराण्याचं वलय लाभल्यामुळे मतदारसंघ ते विधानसभा सगळीकडे त्यांचीच चर्चा असते. कोणत्या विषयावर चर्चा असो वा भाषण रोहित पवार आपली मतं रोखठोक मांडत असतात. पण...

रोखठोक बोलणे ही जशी त्यांची खासियत तशीच त्यांची आणखी एक खासियत आहे. आमदार रोहित पवार सोशल मीडियावर विविध कारणास्तव नेहमीच चर्चेत राहत असतात.

झी मीडियाच्या किचन कल्ला का रेसिपी कार्यक्रमात त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपच्या पंकजा मुंडे आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यापेक्षाही सरस असे पोहे बनविले होते. त्यानंतर आमदार रोहित पवार खूपच ट्रोल झाले होते.

आज आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील जंगली महाराज रोडवर असणाऱ्या खाऊ गल्लीत एका कार्यकर्त्याच्या पावभाजीच्या गाडीला भेट दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केलं.

त्या कार्यकर्त्यांचा आग्रह आमदार रोहित पवार यांना मोडवेना. त्यांनी गरम तव्यावर स्वतः पाव भाजी तयार केली. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.

यापूर्वीही आमदार रोहित पवार आपल्या अनेक कार्यकर्त्यांच्या दुकानात, घरी गेले आहेत. कोणताही अभिनिवेश न दाखवता अगदी साधेपण ते जपत आहेत. त्यांच्या या साधेपणावर कार्यकर्तेही भाळत असून त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय हे नक्की..