विजेच्या धक्क्याने तीन जणांचा मृत्यू

 यात माय लेकरासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण सुदैवाने बचावले.

Jaywant Patil Updated: Mar 31, 2018, 11:37 PM IST

सांगली : सांगलीतल्या येलुर भागात विजेच्या धक्क्याने तीन जणांचा मृत्यू झालाय. यात माय लेकरासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण सुदैवाने बचावले. प्रभाकर लक्ष्‍मण महाडिक, छाया लक्ष्‍मण महाडिक आणि  प्रकाश भिमण्‍णा मगदूम अशी मृत झालेल्या तिघांची नावं आहे. शेतातील विजेच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे शॉक लागून या तिघांचा जागीच मृत्यू झाला.