Positive Story | व्यायाम करण्याचा कंटाळा येतोय? मग या तरुणाची प्रेरणादायी स्टोरी वाचाच...

हा तरूण तुमच्या-आमच्यापेक्षा वेगळा आहे. अपंगत्वावर मात करत त्यानं सगळ्यांनाच कोरोनाच्या नेगिटव्ह वातावरणात पॉझिव्हीट मेसेज दिला आहे.

Updated: Jun 28, 2021, 08:41 PM IST
Positive Story | व्यायाम करण्याचा कंटाळा येतोय? मग या तरुणाची प्रेरणादायी स्टोरी वाचाच... title=

जावेद मुलाणी, झी 24 तास, बारामती | कोरोनानं सारं जग हैराण आहे. कोरोनामुळे सर्वांनाच आरोग्यचं महत्व समजलंय. त्यामुळे प्रत्येक जण आपलं आरोग्य राखण्यासाठी काळजी घेतंय. आपलं शरीर सक्षम करण्यासाठी कोणी पौष्टिक आहार घेतोय तर कुणी जोर बैठका मारतंय. फलटणच्या एका तरूणानंही व्यायाम करण्याचा संदेश सर्वांना दिलाय. पण हा तरूण तुमच्या-आमच्यापेक्षा वेगळा आहे. अपंगत्वावर मात करत त्यानं सगळ्यांनाच कोरोनाच्या नेगिटव्ह वातावरणात पॉझिव्हीट मेसेज दिला आहे. (Tired of exercising Then read baramati young man Aakash Bagav inspiring story)   

ही गोष्ट आहे फलटणच्या आकाशची. आकाशने अपंगत्वाबाबात लोकांची सहानभूती घेतली नाही. तो दररोज एक पाय नसतानाही एका पायावर व्यायाम करतो. जोर बैठका मारतो. आकाशच्या व्यायाम करण्याच्या जिद्दीपुढे आकाशही ठेंगण झालंय. 

आकाश बागव अवघ्या 18 वर्षांचा तरुण आहे. आकाश फलटण तालुक्यातील गोखळी गावाचा रहिवासी आहे. आकाश दररोजची कामही जबाबदारीने पार पाडतो. तो घरातील कामातही हातभार लावतो. आकाशला काही वर्षांपूर्वी अपघातामध्ये दुर्देवाने आपला एक पाय गमावावं लागला होता. पण आकाश नियतीपुढे शरण गेला नाही. त्याने हार न मानता आहे त्या परिस्थितीवर मात करण्याचं ठरवलं. त्याच्या या जिद्दी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अपंगत्वावर मात केलीय.

दररोज गुरांना चारा-पाणी देणं, घरकामात मदत करणं, हे सर्व करताना आकाशला अपंगत्व कुठेच आड येत नाही. अपघातानंतर आपल्या जवळचे पाठ फिरवतात. गरजेच्या वेळात निघून जातात. पण त्याला त्याच्या मित्रांनी त्याला मोठा आधार दिला आहे. आकाशच्या घरची परिस्थिती ही बेताचीच. पण त्याच्या मित्रांनी केलेली मदत ही आकाशसाठी बळ ठरलंय.

अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. कोरोनानं अनेकांचे संसार उध्वस्त झाले. कुणाच्या जिवाभावाची व्यक्त गेलीय. पण या संकटकाळातही आकाशनं दाखवलेली जिद्द सर्वांना प्रेरणादायक आहे. एखाद्या संकटामुळे रडत बसण्यापेक्षा लढून त्यावर मात केली तर आकाशही ठेंगणं व्हायला वेळ लागत नाही हेच त्यानं आपल्या कृतीतून दाखवून दिलंय.

संबंधित बातम्या : 

'व्यापारी म्हणतात, कोरोनासे नही साहब, लॉकडाऊन से डर लगता है!'

Sharad Pawar | ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार? शरद पवार म्हणतात...