ठाणे : भर पावसात ठाणे महानगरपालिकेने ठाण्यातील वर्तकनगर परिसरात असणाऱ्या पोलीस लाईन धोकादायक असल्याचं सांगून खाली करण्यास सुरुवात केलीय. ऐन पावसात इमारत सोडण्यास सांगितल्यामुळे जायचं कुठं? असा प्रश्न इथल्या रहिवाशांना पडलाय.
या परिसरात एकूण ५ इमारती धोकादायक ठरवण्यात आल्या आहेत. त्यात एकुण ३५० पोलीस कुटुंबीय राहत आहेत. सध्या त्यांना ठाण्यातील घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा येथे पाठविण्यात येणार आहे. मात्र, आपल्याला त्याच परिसरातच जागा द्यावी अशी मागणी या रहिवाशांनी केलीये.
ठाणे महानगरपालिका आता या प्रकरणी काय भूमिका घेते याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.